Home latest News बेपत्ता महिलासह दोन मुलांचे मृतदेह सापडले विहिरीत

बेपत्ता महिलासह दोन मुलांचे मृतदेह सापडले विहिरीत

77

बेपत्ता महिलासह दोन मुलांचे मृतदेह सापडले विहिरीत

बेपत्ता महिलासह दोन मुलांचे मृतदेह सापडले विहिरीत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशिम रिसोड : -12 ऑगस्टपासून बेपत्ता महिला व तिच्या दोन निष्पाप मुलांचे मृतदेह रिसोड तालुक्यातील देगाव फाटा येथील भावना पब्लिक स्कूलच्या पाठीमागील शेतातील विहिरीत आढळून आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील पूजा रामदास मोरे वय 24 वर्ष ही मुलगी ईश्वरी रामदास मोरे वय 5 वर्षे व मुलगा विराज रामदास मोरे वय 1 वर्ष या दोन मुलांसह 12 ऑगस्टपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिघांचाही खूप शोध घेतला मात्र कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे रिसोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे पोलीस त्यांची चौकशी करत होते.आज १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता रिसोड पोलिसांना तिघांचे मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच रिसोडचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला, या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई, पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरगुडे, पोलीस कर्मचारी गजानन बावस्कर, सुशील इंगळे, खंदारे, भास्कर यांनी ही कारवाई केली. तिघांचे मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली✍