आ. भरतशेठ गोगावले यांनी केली अपघातग्रस्त व्यक्तीला मदत
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-म्हसळा श्रीवर्धन मार्गावरील घाटात आज शनिवारी संध्याकाळी उशीरा एक मोटर सायकल अपघातग्रस्त झाली. या अपघातामध्ये मोटर सायकल स्वार गंभिररित्या जखमी होऊन रस्त्यात पडला होता. दरम्यान याच रस्त्यावरून महाडचे आ. भरत गोगावले प्रवास करीत होते. त्यांनी लागलीच अपघात स्थळी थांबुन जखमी मोटर सायकल स्वाराला तातडीने उपचार मिळावे यासाठी आपल्या सुरक्षेसाठी सोबत असलेली पोलिस गाडी त्यांनी जखमी रुग्णालयात नेण्यासाठी सोडून दिली.
त्यांनी दाखवलेल्या या माणुसकी मुळे आज एका अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचले सदर व्यक्तीचा अपघात हा जंगल भागातील निर्जन स्थळी रस्त्यावर झाला होता आमदार गोगावले श्रीवर्धन कडून महाड कडे येत असताना त्यांना तो अपघात ग्रस्त व्यक्ती रस्त्याच्या कडेला निपचित पडलेल्या अवस्थेत दिसला आणि ताबडतोब गाडी थांबून आपली सुरक्षेसाठी असलेली व्हॅन त्यामध्ये सदर व्यक्तीला रुग्णालयात पाठवले या कामासाठी पोलिसांनी देखील सदर व्यक्तीला उचलण्यास मदत करून स्वतःच्या गाडीत श्रीवर्धन रुग्णालयात घेऊन गेले आणि त्या व्यक्ती चे प्राण वाचले सदर व्यक्तीवर आता श्रीवर्धन रुग्णालयात उपचार सुरू आहेत