समता परिषद यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०
मुंबई,दि. १५ ऑक्टोबर: शैक्षणिक आणि सामाजिक वैशिष्ट्यपुर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणा-या समता परिषद, मुंबई यांच्या वतीने वर्ष २०२१-२०२२मधील माध्यमिक शाळांमधून एस्. एस्. सी. परिक्षेत ७५% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या बृन्हमुंबई महानगरपालिका मधील शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे,
यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांचा “गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ”
दादरमधील ‘भारत सेवा सदन हॉल’ मध्ये उत्कृष्ट रित्या संपन्न झाला.
गेले अनेक वर्ष विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपुर्ण उपक्रम राबवून तळागाळातील रत्नांचा गुणगौरव करून सन्मान करण्याची संकल्पना समता परिषदेचे अध्यक्ष आमदार मान. विजय (भाई) गिरकर यांच्या मुंबईत राबविण्यात येत असताना ह्यावर्षी संपुर्ण बृन्हमुंबईमधील सर्व महानगरपालिकासह माध्यमिक शाळांतील एस्. एस्. सी. गुणवंत यशस्वी विद्यार्थींचे ‘कौतुक समारंभ’ आयोजित केली होती.
ह्यावेळी समारंभाध्यक्ष म्हणून आमदार मान. विजय (भाई) गिरकर ह्यांच्या अधिपत्याखाली आणि प्रमुख पाहुणे भाजपचे विधानपरिषद गटनेते आमदार मान. प्रविण दरेकर ह्यांची विशेष उपस्थिती लाभली. तर विशेष अतिथी म्हणुन सौ. समिता कांबळे (नगरसेविका); श्रीमती प्रितम पंडागळे (नगरसेविका); सौ. प्रतिभा गिरकर (नगरसेविका)* ह्यांच्या उपस्थितीत
यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्रक, फोल्डर फाईल, पाकिटबंद मानधन, पेन आणि पुष्पगुच्छ देत मिष्ठान्न देऊन सन्मानित करून
कौतुक समारंभ संपन्न करण्यात आला.
तसेच, हा समारंभ यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस संजय आढांगळे यांच्यासह संस्थेच्या शिक्षण विभाग प्रमुख विजयभाऊ पवार, उदय पडेलकर तसेच, देवदत्त तांबे आणि सुभाष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
विशेष बाब म्हणजे बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी* यांनी ज्ञानविकास नाईट हायस्कुल, सायन मधून एस्. एस्. सी. परिक्षेत ७८.४०% काढले म्हणून समारंभाध्यक्ष यांच्या सुचनेनुसार आमदार मान. विजय (भाई) गिरकर यांना पुष्पगुच्छ आणि शाल बहाल करून सन्मान करण्याचा बहुमान दिला तर रात्रशाळेतून उच्च श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले यासाठी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी म्हणून कौतुक करत संस्थेकडून देण्यात येणाऱ्या सन्मान स्वरुप वस्तू बहाल केल्या.
शेवटी राष्ट्रगीत ने “गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभाचा” समारोप करण्यात आला.








