बाबूपेठ फुले चौक येथून चोरट्यांनी केली दुचाकी लंपास

49

बाबूपेठ फुले चौक येथून चोरट्यांनी केली दुचाकी लंपास

बाबूपेठ फुले चौक येथून चोरट्यांनी केली दुचाकी लंपास

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 9860020016

चंद्रपूर : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की बाबूपेठ येथे राहत असणारे साप्ताहिक गोदावरी चे उप संपादक श्री धम्मशील शेंडे, यांची दुचाकी (पॅशन प्रो) या कंपनीची दुचाकी गाडी नंबर MH 34 AN 4887 क्रमांकाची दुचाकी काल रात्रो धम्मशील शेंडे यांच्या घरासमोरून, डॉ पाझारे हॉस्पिटल, बाबूपेठ, उड्डाणपुला च्या खालून दिनांक 25 चे रात्रो ते पहाटे च्या सुमारास चोरीला गेलेली आहे . धम्मशील शेंडे यांना सकाळी उठल्यावर कळताच यांनी सिटी पोलीस स्टेशन गाठून त्या अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे .परंतु अद्यापही चोरट्याचा पत्ता लागलेला नाही पुढील तपास सिटी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक करीत आहे. बाबूपेठ परिसरात ही पहिलीच घटना नसून अशा अनेक घटना घडत आहेत म्हणून बाबूपेठ परिसरातील जनतेत आपआपल्या गाड्याना घेऊन एक भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या दुचाकी चोरट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी बाबूपेठ परिसरातील जनतेने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.