किरकोळ भांडणावरून परस्पर विरोधी तक्रार, तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-तळा येथील एसटी स्टँडच्या मागे अंडी बिस्किटे विक्रेते मनोहर डोळस आणि लगतच असणारे डॉ.चंद्रकांत विचारे यांच्या झालेल्याकिरकोळ भांडणातून एकमेका विरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस ठाण्यातून मिळाली आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा येथील एसटी स्टँडच्या मागील अंडी, बिस्किटे विक्रेते मनोहर डोळस  त्यांच्या दुकानासमोर डॉ. विचारे यांच्याकडे आलेल्या पाहुण्यानी गाडी लावली असता गाडीवरच्या काचेचे रिफ्लेक्शन दुकानात होऊन काम करताना अडचण निर्माण होत होती हे सांगाण्यासाठी फिर्यादी मनोहर डोळस गेले असते तेथे गाडी मागे घेण्यास सांगितले त्याच वेळी फिर्यादी यांनी गाडीमागे घेतली याच वेळेला डॉ. शिवराज विचारे यांनी मागील राग काढून फिर्यादी मनोहर डोळस त्याच्या डोळ्यांवरती बुक्की मारून दगड मारून दुखापत केली याबद्दल पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत  गू.र.नं१०१.२०२२भा.द.वि.क.३२४,३२३,५०४,३४लावण्यात आले असून पोलीस निरीक्षक गोविंदओमासे यांचें मार्गदर्शना खाली पो.ह.संदीप शिंदे करीत आहेत.

फिर्यादी डॉ चंद्रकांत विचारे यांनी आरोपी डोळस यांना सांगितले कि गाडी काढायला सांगितली आहे आरोपी कंपाऊंड मध्ये येऊन डॉ. मुलगा शिवराज याला शिविगाळी व मारहाण करून भांडणाचा राग काढून दुखापत केली यावेळी फिर्यादी डॉ चंद्रकांत विचारे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण केली अशी तक्रारगुन्हा. र.नं.१०२भा.द.वि.क.३२४, ४४७,५०४,५०६, दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शन खाली आर आर सानप करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here