माणगांव येथील तलाठी कार्यालयात 45 हजाराच्या साहित्याची चोरी
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-माणगांव शहरातील कचेरी रोड येथील तलाठी भवन येथे एका अज्ञात इसमानी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी सवा दहा वाजण्याच्या सुमारास 45 हजाराचा ऐवज घेऊन फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याबाबत सविस्तर वृत्त असं की पळसगाव बुद्रुक चे कोतवाल मनोहर बापू कांबळे वय वर्ष 53 रा. पळसगाव खुर्द ता. माणगांव यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली या घटनेबाबत माणगांव पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की माणगांव तलाठी भवन येथे कोणत्यातरी अज्ञात चोरट्यानी बंद कार्यालयाचा दरवाजा काडीकोयडा कोणत्यातरी हत्याराने तोडून कार्यालयात प्रवेश करून कार्यालयातील 15 हजार रुपये किमतीचा तलाठी प्रियंका यांचा एक डेल कंपनीचा जुना वापरता लॅपटॉप 30 हजार रुपये किमतीचा तलाठी मोराळे याचे एच पी व एसीईआर कंपनीचे जुने वापरते दोन लॅपटॉप तसेच तलाठी प्रियंका याच्या बॅगेतील अप्पर तहसीलदार याचेकडील दावा क्रमांक 73/2022 चे कागदपत्र असा एकूण 45 हजार रुपयाची चोरी केली.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध करण्यात आली असून कॉ. गु रजि नं.323/2022 नुसार भा. द. वि.स. कलम 454,457,387 प्रमाणे अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माणगांव पोलीस ठाण्याचे स. पो. निरीक्षक आस्वर,पो स ई गायकवाड,पो. ह मगर हे पुढील तपास करीत आहेत.