बोरगाव मंजू नजीक ट्रकच्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार.
सिद्धार्थ पाटील प्रतिनिधी
बोरगाव मंजू:- पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक मोटारसायकल स्वार ठार झाला ही घटना बुधवारी घडली
माहितीनुसार बोरगाव मंजू कडून अकोला कडे जाणारा ईश्र्वर पंढरीनाथ जोशी वय ३० वर्ष रा गंगापुर जिल्हा जळगाव खान्देश हे आपली मोटारसायकल क्रंमाक एम.एच.१९ डीसी ६५३३ ने जात होते दरम्यान बोरगाव मंजू कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ४०बीएल ५२६३ जात होता दरम्यान सदर मोटारसायकल स्वार यास बोरगाव मंजू जवळ जबर धडक दिली या अपघातात ईश्वर जोशी गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे योगेश काटकर, शे. फईम शे. चाॅद, संजय इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर जखमीस शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी ईश्वर जोशी यास मृत घोषित केले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदर ट्रक सह चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करत आहेत.