चांदूर बाजार तालुक्यात घरात शिरलेल्या तरुणाला पकडण्यासाठी बाहेर पडला पती, परत येण्यापूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या.

अमरावती:- चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा घरात शिरलेल्या तरुणाला पकडण्यासाठी बाहेर पडलेला पती परत येण्यापूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात मंगळवारी सकाळी 11 ते 12 च्या सुमारास उघड झाली. राणी 23 असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा पतीच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शहरालगतच्या एका गावातील रहिवासी 30 वर्षीय तरुण चांदूर बाजार येथील एका बँकेत नोकरी करतो. तो मंगळवारी सकाळी चांदूर बाजार येथे बँकेत गेला. त्यावेळी त्याची पत्नी गावातील घरात एकटीच होती. सकाळी 11 च्या सुमारास त्याला गावातील एकाने त्याच्या घरात प्रीतम नामक व्यक्ती शिरल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या बँक कर्मचाऱ्याने तातडीने घर गाठले. त्याला घरात पाहताच प्रीतमने पळ काढला. त्याला पकडण्यासाठी तो बँक कर्मचारी धावला. काही अंतरापर्यंत पाठलागदेखील केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. दमून बँक कर्मचारी असलेला तो तरुण घरी परतला तेव्हा घरातील बेडरूमचे दार आतून बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. शेजाऱ्यांच्या सहकार्याने त्याने दार उघडले असता, पत्नीने ओढणीने गळफास घेतला होता. त्याने तातडीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पती घराबाहर पडताच भीती व बदनामीपोटी तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. ठाणेदार सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा मेश्राम व शिपाई शुभांगी काळे या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here