चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या.

अंकित रामटेके असं आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव आहे

चंद्रपूर:- जिल्हा कारागृहात आरोपीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंकित रामटेके असं आत्महत्या करणाऱ्या कच्च्या कैद्याचे नाव आहे. जुलै 2020 मध्ये दुर्गापूर येथे अनिकेत रामटेके या आपल्या लहान भावाचा खून केल्याच्या आरोपात अंकित रामटेके याला अटक झाली होती. आज सकाळी त्याचे शरीर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने कारागृहात एकच पळापळ झाली.

दरम्यान घटनेची माहिती न्याय विभागाला दिली गेली. पोलीस पथक-कारागृह अधिकारी, न्यायदंडाधिकारी यांच्या हजेरीत पंचनामा करण्यात आला असून ही घटना नेमकी कशी घडली, त्यावेळेस बंदोबस्तावर असलेले कर्मचारी काय करत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here