मुजोरगिरी व अरेरावी करणाऱ्या शाळेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका…

58

मुजोरगिरी व अरेरावी करणाऱ्या शाळेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका!!

संतोष आमले 

रायगड ब्युरो चीफ 

मो: 9220403509

महात्मा शाळेतील सीबीएससी बोर्डातील विद्यार्थ्यांना ‘Special Assembly’ भरवुन बकरी ईद निमित्त काही इयत्तेतील विद्यार्थ्यांना बोलवुन त्यांना हिजाब घालायला लावणे, कुराण ऐकवणे असा प्रकार १-२ दिवसांपूर्वी शाळेमध्ये घडण्यात आला. ह्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष अनिमेष ओझे व पनवेल महानगरअध्यक्ष अनिकेत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज शाळेवर धडक देण्यात आली. तसेच सदर दिवशी आषाढी एकादशी असून देखील कोणत्याही प्रकारची दिंडी अथवा सोहळा का साजरा करण्यात आला नाही असे प्रश्न मनविसेने उपस्थित केले. 

जर धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रकार ताबडतोब थांबवले नाही आणि महाराष्ट्रातील आपले सण साजरे झाले नाही तर ह्या पुढे होणाऱ्या समस्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या पद्धतीने खळ्खट्याकची भुमिका घेईल आणि ह्याला संपूर्ण शाळा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला.

ह्यावेळी जिल्हाअध्यक्ष अनिमेष ओझे व पनवेल महानगरअध्यक्ष अनिकेत मोहिते जिल्हासचिव अक्षय जोशी, पनवेल तालुकाध्यक्ष सागर गायकवाड, महानगरसचिव अमर पाटील, कामोठे उपशहर अध्यक्ष प्रफुल पाटील, महाराष्ट्र सैनिक केदार रेवाळे,रुद्र पाटील, मृण्मय पाटील आदी उपस्थित होते.

संपूर्ण प्रकरणाची दखल घेत शाळा प्रशासनाने मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या नावाने पत्र काढून झालेल्या संपूर्ण घटनेची माफी मागितली तसेच सोमवारी आषाढी एकादशी साजरी करणार असे परिपत्रक काढण्यात आले.