Home latest News धक्कादायक घटना…! बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक घटना…! बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

95

धक्कादायक घटना…! बुलढाण्यात ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

विशाल सुरवाडे

जळगाव ब्युरो चीफ

मो: 9595329191

बुलढाणा – येथील राजूर घाटात धक्कादायक घटना घडली असून एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आठ जणांनी या महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे बुलढाण्यासह सर्वदूर खळबळ उडाली आहे.

पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच गुरुवारी राजूर घाटातून दुपारी जात होती, दरम्यान राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता.त्यानंतर त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. महिलेला दरीत ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम देखील लुटून घेतली.

दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. सोबतच पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. व घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आ. संजय गायकवाड यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनाही कल्पना दिली. त्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हालचाल सुरू केली. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहे.