Home latest News माहेगावची सुकन्या… पंजाब येथील जलंदर महाविद्यालयात निवड

माहेगावची सुकन्या… पंजाब येथील जलंदर महाविद्यालयात निवड

82

माहेगावची सुकन्या… पंजाब येथील जलंदर महाविद्यालयात निवड

सुनील भालेराव

अहमदनगर ब्युरो चीफ

मो. नं.9370127037

27 जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी श्री प्रशांत रामकृष्ण खडतकर सर यांची सुकन्या कु.उन्नती प्रशांत खडतकर या मुलीने Jee व NIT परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून यश संपादन केले .

या मुलीने पहिल्याच टप्प्यात यश संपादन करून पुढील शिक्षणासाठी पंजाब येथील जलंदर महाविद्यालयात प्रवेश मिळवला या तिच्या कामगिरीबद्दल पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख पोहेगाव कोळपेवाडी व कोपरगाव तालुक्यातून कुमारी उन्नतीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले .

या मुलीच्या या यशामागे तिचे शिक्षक व अधिकारी व पदाधिकारी प्राचार्य तसेच या मुलीचे वडील श्री .प्रशांत खडतकर. सर आजोबा डॉ. रामकृष्ण खडतकर. त्याचबरोबर श्री.अमित खडतकर व श्री.नितीन खडतकर. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . व या मुलीने माहेगाव देशमुख चे नाव उंचावले .