चंद्रपूरातील साहित्य रत्न हरपले – आ. जोरगेवार

49

चंद्रपूरातील साहित्य रत्न हरपले – आ. जोरगेवार

 

अश्विन गोडबोले

 चंद्रपूर ब्युरो चीफ

📱 8830857351

चंद्रपूर :.चंद्रपूरच्या सांस्कृतिक ,साहित्यिक क्षेत्राचे आधारवड ,चंद्रपूर भूषण , सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर सरांचे रविवार 30 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवार 31 जुलै 2023 ला सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्यानगरी येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.

मदनराव धनकर म्हणजे चंद्रपूर च्या साहित्य क्षेत्रातील चालते बोलते ज्ञानकोश होते. त्यांच्या दुःखद निधनाने आज चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातील एक अनमोल असे साहित्य रत्न हरपले आहे. ही चंद्रपूरच्या साहित्य क्षेत्रातील कधीही भरून न निघणारी अशी पोकळी असुन त्यांच्या अशा अचानक जाण्याने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे… त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना प्रदान करो हीच प्रार्थना.

त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐