Home latest News सोलापुरच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियातून झालेली ओळख ठरली घातक.

सोलापुरच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियातून झालेली ओळख ठरली घातक.

77

सोलापुरच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियातून झालेली ओळख ठरली घातक.

सोलापूर:- येथील एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका विवाहित तरुणाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी 1 जानेवारी उघडकीस आली. दरम्यान, विवाहित तरुणाला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन तरुणीची आरोपी तरुणासोबत सोशल मीडियातून ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत तरुणाने त्या मुलीशी जवळीक निर्माण केली. शुक्रवारी सकाळी कॉलेजला गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. सायंकाळी उशिरा ती मुलगी घरी आली व आपल्याला आरोपी तरुणाने घेऊन गेल्याचे सांगितले.

यामुळे मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला फताटेवाडी येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.