कुणबी युवा मंच मुंबई(रजि.) तालुका माणगांव आयोजित, वालावळकर रुग्णालय डेरवण-चिपळूण यांच्या विशेष साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर पार…

सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ
मो: 8080092301
माणगांव :-मागील ढालघर या ठिकाणी झालेल्या शिबिरामध्ये लोकांचा प्रतिसाद तसेच गोरेगाव विभागातील, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेची आरोग्य तपासणी विषयक मागणी बघता हा शिबीर आपण मंच च्या माध्यमातून गोरेगाव या ठिकाणी घेण्याचे ठरवले आणि आज ते मंच च्या कमिटी ने योग्य नियोजन करून शिबीर पुर्ण झाले आजच्या वैद्यकीय शिबिरासाठी मंच अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलं करून उपस्थित वालावळकर रुग्णालय डेरवण चिपळूण रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका, सोसिअल वर्कर, मदत स्टाफ यांचे स्वागत मंच च्या वतीने करण्यात आले.स्वागत समारंभ चा कार्यक्रम चे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले स्वागत कार्यक्रम होताच आरोग्य शिबीर मध्ये रुग्ण तपासणी चालू करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव – माणगांव येथे पार पडले हे आरोग्य शिबीर
दुपारी उशिरा आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात आली.शिबिरासाठी रुग्णालय सोबत आशा सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरासाठी लोकांचा फार चांगला सहभाग मिळाला आणि लोकांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांची विशेष तज्ञ डॉक्टर यांच्याकडून योग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक लोकांनी आजच्या शिबिरासाठी कुणबी युवा मंच मुंबई(रजि)तालुका माणगांव या आपल्या सामाजिक संघटनेचे कौतुक करून विशेष आभार मानले.आजच्या मोफत आरोग्य शिबिरासाठी मंच प्रमुख उपस्थिती म्हणुन माणगाव महाड पोलादपूर विभाग चे स्थानिक आमदार श्री भरतशेठ गोगावले, माणगांव चे नगराध्यक्ष श्री ज्ञानदेव पोवार, गोरेगाव पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री नवले सर , पोलीस श्री सानप, श्री धोंडगे, श्री उभारे, नागाव सरपंच वामन बैकर,वालावळकर रुग्णालय चे श्री सचिन धुमाळ, डॉक्टर श्री संदेश तेटगुरे,मुंबई शाखेचे उपाध्यक्ष श्री संतोष ढेपे, संघ प्रतिनिधी श्री चेतन मोरे,ग्रामीण भागातून श्री रामभाऊ टेंबे, श्री प्रकाश टेंबे,श्री प्रभाकर ढेपे, श्री अरुण चाळके, श्री महेंद्र तेटगुरे, श्री रवी टेंबे, पत्रकार श्री राम भोस्तेकर,श्री राकेश भोस्तेकर, पत्रकार कोकण ब्युरो चीफ सचिन पवार,पत्रकार विवेक काटोलकर, राजु सुतार,ग्रामीण शिक्षक श्री सुरेश पालकर सर,श्री सुधाकर करकरे सर, श्री पाटोळे सर, श्री भात्रे सर,श्री मुकेश भोस्तेकर, श्री वैभव टेंबे, श्री संतोष टेंबे, श्री चंद्रकांत भोजने, श्री विश्वनाथ माठल, श्री म्हस्के,पहेल सरपंच,तसेच मेडिसिन साठी M.R. श्री महेश लहाने, श्री राजू तेटगुरे, श्री जिगर भोनकर यांनी विशेष सहकार्य करून उपस्थित राहिले.

महिला आशा सेविका सौ सत्वे आणि त्यांची पुर्ण टिम.उपस्थित होती.तसेच *कुणबी युवा मंच मुंबई(रजि) तालुका माणगांव* चे *अध्यक्ष* – श्री ज्ञानेश्वर खराडे,*सचिव* – श्री सत्यजित भोनकर,खजिनदार* – श्री नारायण शिंदे,*वैद्यकीय प्रमुख* श्री राजेश शिर्के, श्री काशिनाथ शिंदे, श्री प्रफुल भोजने.
तसेच कुणबी युवा मंच मुंबई(रजि) तालुका माणगांव चे
*उपाध्यक्ष* -श्री सुनिल माठल,
श्री सुभाष भोस्तेकर.
*सहसचिव* -श्री निलेश खडतर,
श्री अजय भोनकर.
*संपर्क प्रमुख* – श्री संतोष उंडरे,*संघटक* – श्री मोहन म्हस्के,*सल्लागार* – श्री नरेश भोसले,*महिला सदस्य*सौ.स्वरूपा स्वप्नील भोईर
सौ.तन्वी तुकाराम म्हस्के
सौ.कल्पना बाळू खराडे
सौ.विक्रान्ती विक्रम कालेकर
सौ. रूपेक्षा राकेश भोस्तेकर उपस्थित होते..मंच च्या वतीने आजच्या कार्यक्रम चे सत्रसंचलन सचिव श्री सत्यजित भोनकर यांनी केले.कार्यक्रम चे आभार भाषण अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खराडे यांनी केले त्यांनी आपल्या भाषनातून आजच्या कार्यक्रम साठी उपस्थित वाळावळकर रुग्णालय डॉक्टर,परिचारिका,मदत स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव डॉक्टर, परिचारिका, मदत स्टाफ,समाज बांधव,मदतगार, सहकार्य करणारे सर्वांचे मंच च्या वतीने आभार माणण्यात आले…








