चंद्रपूर जिल्ह्यातील श्वेता उमरे MPSC परीक्षेत उत्तीर्ण

चंद्रपूर जिल्ह्यातील श्वेता उमरे MPSC परीक्षेत उत्तीर्ण

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
992111523

राजूरा : 15 सप्टेंबर
महाराष्ट राज्य लोकसेवा आयोग MPSC मार्फत 2022 वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील (पालगाव) ( एल अँड टी) येथील श्वेता बाबाभिम उमरे हिने महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून दुसरा क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत महिला उमेदवारांमध्ये 24 वा क्रमांक पटकावला.
श्वेता उमरे हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (गट क) 2022 मध्ये दिली होती.
श्वेता हिचे प्रायमरी शिक्षण जि. प. शाळा पालगाव येथे झाले असून त्यानंतर पाचवी पासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजूरा संस्थेतील जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महा. आवाळपूर येथे झाले आहे.
श्वेताच्या यशाबद्दल तिचे आणि तिच्या आई -वडिलांचे शिक्षक, आणि मित्र मैत्रिणींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here