या पुढे शहर – ग्रामीण भागात मटका – जुगार अवैध धंदे कायम बंद ठेवण्यात येतील (आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले!)

50
या पुढे शहर - ग्रामीण भागात मटका - जुगार अवैध धंदे कायम बंद ठेवण्यात येतील (आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले!)

या पुढे शहर – ग्रामीण भागात मटका – जुगार अवैध धंदे कायम बंद ठेवण्यात येतील

(आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले!)

या पुढे शहर - ग्रामीण भागात मटका - जुगार अवैध धंदे कायम बंद ठेवण्यात येतील (आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले!)

(✒️बबलू भालेराव तालुका प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड – (22 सप्टेंबर)
शहरातील अवैद्य व्यवसायीकांकडून सुरु असलेले मटका – जुगार, गुटखा विक्री तसेच विडूळ, चातारी बीट मधील अवैध गावठी व देशी दारू चापुढे पूर्णतः बंद राहतील तसेच आंदोलकांना आंदोलना दरम्यान मोबाईल वरून धमक्या आल्या होत्या त्याबाबत तिघा जणानी उमरखेड पोलीसात लेखी फिर्याद दाखल केली.

त्या प्रकरणी कार्यवाही केल्या जाईल असे लेखी आश्वासन 22 सप्टेबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदिप पाडवी आणि ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या प्रशासनातील प्रतिनिधी पोलीस उपनिरिक्षक अमोल राठोड यांनी हा लेखी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्या माध्यमातून उपोषण मंडपात आंदोलक यांना आश्वासन देऊन पुढिल कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्टपणे यावेळी ठरले त्यावरून 18 सप्टेंबर रोजी सुरु केलेले उपोषण आज शुक्रवारी पाठीमागे घेतले

उमरखेड शहर व परिसरातील गावांमध्ये सर्वच बीट अंतर्गंत जुगार वरळी मटका, गावठी व देशी दारू राजरोसपणे अनेक दिवसांपासून सुरु असल्यामुळे हे सर्व अवैद्य धंदे पुर्णतः बंद होण्यासाठी शे. इरफान, विजय कदम व बाबुराव ढगे यांनी एसडी पि ओ प्रदिप पाडवी यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.

एवढे काही उपोषण सुरु असतांना ही शहरात दोन जुगार अड्डे व काही ठिकाणी वरळी मटक सुरुच आहे.
ही बाब पोलीस प्रशासना समोर खेदजनक आहे.

असे उपस्थित झालेले उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड व पोलीस उपनिरिक्षक अमोल राठोड याच्या समोर उपोषणकर्त्यानी ही बाब समोर दाखऊन दिली.

यावेळी अनेक पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.