विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं.

60

विवाहीत महिलेसोबत अफेयर; गोणीत बांधून त्याला नाल्यात फेकलं.

खेडा:- विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एका व्यक्तीला गोणीत बांधून थेट नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये उघडकीस आला आहे.

गुजरातच्या खेडा येथील चिकलोद गावात हा प्रकार घडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. विवाहीत महिलेच्या भावांनी जीवन राठोड नावाच्या व्यक्तीला गोणीत बांधून नाल्यात फेकून दिलं. सुदैवाने राठोड याचा मृत्यू झाला नाही. पोलिसांनी गोणी बाहेर काढून या राठोड याला वाचवलं आणि उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

24 तासांनंतरही जिवंत
जीवन राठोड या 26 वर्षीय व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून गोणीत बांधून नाल्यात फेकल्याच्या 24 तासांनंतरही तो जिवंत बाहेर आला आहे. नाल्यात फेकण्यात आल्यानंतर त्यानं आरडाओरडा सुरू केला होता. स्थानिक रहिवाशांना आवाज आल्यानंतर पोलिसांना बोलावून त्याची सुटका करण्यात आली.

जीवन राठोड हा शेतकरी आहे. त्याचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये वारंवार फोनवर बोलणं व्हायचं आणि भेटणंही होत होतं. संबंधित महिलेच्या भावांच्या मनात याबाबत राग होता. पोलिसांनी सध्या दोन्ही भावांना अटक केली असून त्यांच्याविरोधात अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.