Home latest News इंदापूरमध्ये धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

इंदापूरमध्ये धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

85

माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण 

सचिन पवार 

कोकण विभाग प्रतिनिधी

मो: 8080092301

रायगड :-माणगांव तालुक्यातील इंदापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की मौजे इंदापूर येथील आरोपी गिरीष दिलीप नवगणे रा. नवगणे आली इंदापूर माणगांव याने पिढीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असूनही जानेवारी 2023 तारीख माहित नाही हिला स्वतः च्या राहत्या घरात बोलावून तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते.

याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध कॉ. गु. रजि. नं ३०७/२०२३ भा. द. वि. सं. कलम ३७६ (२) (j) बालकाचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ पोक्सो कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप विभागीय अधिकारी नितीनं कुमार पोंदकुळे, माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अस्मिता पाटील पोलीस नाईक गदमले हे करीत आहेत.