Home latest News *पत्नीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल*

*पत्नीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल*

103

*पत्नीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल*

*सांगवी,पुणे* – पत्नीचे अर्धनग्न फोटो पतीने सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या पतीच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित पत्नीने याबाबत काल बुधवारी उशिरा सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, ३७ वर्षीय पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. त्यांनी हनिमूनच्या वेळी काढलेले अर्धनग्न फोटो पतीने पत्नीची संमती न घेता फेसबुक या सोशल मीडियावर अपलोड करून तिचा विनयभंग केला. संबंधित फेसबुक अकाउंटचा पासवर्ड पत्नीला माहिती असल्यामुळे पतीने तो बदलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.