Home latest News आजंती दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू

आजंती दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू

104

आजंती दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू

हिंगणघाट :- नागपूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर आंजतीत मारूती शोरूम समोर दोन दुचाकी समोरासमोर धडकून घडलेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू तर दोन जण जखमी झालेत. गुरुवारी 7 जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. आजंती शिवारात गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास एम एच 32 ए.सी. 5634 आणि एम.एच. 32 ए.ई. 7265 क्रमांकाच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झालेत. रमेश गोविंदाराव भोमले वय 70 रा. आजंती असे मृतकाचे नाव आहे. नागपूरकडून आपल्या दिशेने हिंगणघाटला येणारा पवन कुबडे हा या अपघातात जखमी झाला. तसेच वासुदेव डडमल रा. चिचघाट हे या अपघातात जखमी झाले. अपघाग्रस्तांना काही लोकांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी रमेश गोविंदराव भोमले यांना मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार पवन कुबडे जामकडून हिंगणघाटला जात असताना रमेश गोविंदराव भोमले हे त्यांच्या शेतातून राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने अचानक समोर आले. बाजूच्या कारची पवन कुबडे यांच्या गाडीला कट लागली असता पवन आणि विरुद्ध दिशेने येणारे रमेश भोमले यांच्या वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. पवन कुबडे हा हेल्मेट घालून असल्याने या अपघातात बचावला. मात्र रमेश भोमले यांचा अपघाती मृत्यू झाला. हिंगणघाट पोलिसांनी अपघातातील वाहनांना हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे जमा केले. पोलिसांनी अपघातप्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.