अवकाळीपावसाने ग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाईतात्काळ दया..!
अन्यथा बि.आर.एस.आंदोलन छेडणार…! आनंदरावअंगलवार

राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने
9921115235
दिनांक :-29 नोव्हेंबर
नुकतेच सतत दोन दिवसा पासून राजुरा विधान सभाक्षेत्रासह चंद्रपुर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने लाखो एकर शेती कापूस व धान पिकासह फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व हजारो शेतकरी चिंतेत दिसत आहेत. तेव्हा माणूसकी जपून मान.मुखयमंत्री श्री. एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यानी सर्व विभागीय आयुक्त ( महसुल )व जिल्हाधिकारी मार्फत पटवारी कर्मचारी व तहसिलदारव कृपी अधिकारी यांचे मार्फत तात्काळ पंनामे करून प्रतिशेतकरीकमीत कमी 3 हेक्टर शेती पर्यंत शेतीचे पिकाचे शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई जाहीर करावे .शासनाने शेतकरीवर्गाला वार्यावर सोडू नये. अधिकारी वर्गाने प्रचलीत पधदतीने नुकसान व बाधीत शेतपिकाचे युध्दपातळीवर पंचनामे करून जास्तीत जास्त निधी शासनाकडून मंजूर होणयासाठी शासनाकडे प्रसताव पाठवून सतत पाठपुरावा करावे. व यथा शिघ्र शेतकर्याना नुकसान भरपाई अदा करावे. सदर नुकसान भरपाई देणयास प्रशासन व शासन दिरंगाई केल्यास येणारे हिवाळी अधिवेशनात भारत राष्ट्र समिती (शेतकरी वर्गाचे पक्ष)महाराष्ट्र द्वारे विशाल मोर्चा नागपूरात नेण्यास पक्ष श्रेषटीकडे शेतकरी वर्गाचे विधायक व न्याय मागणीकडे लक्ष वेधणयास चर्चा करूण निर्णय घेऊन आंदोलन पुकारणार… तेव्हा होणार्या सर्वांगीण परिणामास प्रशासन व शासन जबाबदार राहणार अशा आशयाचे निवेदन मा.उपविभागीयधिकारी राजुरा मार्फत शासनाला चंद्रपुर जिल्हा कार्यकर्ते व राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांचे नेतृत्वात एका शिष्ठ मंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.








