वासंबे जिल्हा परिषद मतदार संघात माधवी ताई जोशी यांनी घेतल्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या भेटी.

74

✒️ संदेश साळुंके ✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३

कर्जत : महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षांनी आपापल्या पक्षाची बांधणी करायला मोठ्या जोमाने सुरुवात केलेली असताना नुकताच शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माधवीताई नरेश जोशी,आणि नरेश जोशी यांनी पक्षप्रवेश करताच मावळ लोकसभा मतदारसंघाची निरीक्षक पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली असताना माधवीताई यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन अनेक भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इन्कमिंग अगदी मोठ्या प्रमाणात सुरू असताना लोकसभेची निवडणूक लढण्याची मनात ईच्छा असल्याकारणाने ताईंनी अगदी मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली आहे. जनमानासातले अनेक समाजापयोगी प्रश्न सोडविण्याचे काम आज ताई करताना पाहायला मिळत आहे.नुकताच वासंबे जिल्हा परिषद मतदार संघातील खलापुर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा पारंगे,अशोक मुंडे उद्योजक, रमेश पाटील माजी सभापती, गीता म्हात्रे माजी सरपंच, राजश्री पवार माजी सरपंच, उद्योजक मोहन लबडे, माजी उपसभापती गजानन मांडे, संतोष मांडे, भाग्यश्री पवार,रमेश पाटील, रेश्मा भगत, विद्यमान सरपंच प्रदीप पाटील, मीनाक्षी पाटील,मा. सरपंच भाग्यश्री पवार, दीपिका तांडेल,अजित सावंत, इत्यादी महाविकास आघाडीच्या दिग्गज कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तर राजकीय विषयावर सकारात्मत चर्चा करून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत दीपिका भांडारकर व महिला, तरुण वर्ग सोबत होते.