काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणसिंग, " है तैयार हम " महारॅली परिवर्तनाचा देणार संदेश रॅलीचे आयोजना करीता राज्यभरातील काँग्रेस नेत्यांनी दोन दिवसापासून नागपूरात ठोकले तळ

काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणसिंग, ” है तैयार हम ” महारॅली परिवर्तनाचा देणार संदेश

रॅलीचे आयोजना करीता राज्यभरातील काँग्रेस नेत्यांनी दोन दिवसापासून नागपूरात ठोकले तळ

काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणसिंग, " है तैयार हम " महारॅली परिवर्तनाचा देणार संदेश रॅलीचे आयोजना करीता राज्यभरातील काँग्रेस नेत्यांनी दोन दिवसापासून नागपूरात ठोकले तळ

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

नागपूर : आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. महारॅलीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. 
जाती-धर्माच्या आडून लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे.  विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.
कॉंग्रेसच्या उमरेड मार्गावरील दिघोरी नाक्याजवळ असलेल्या मैदानात गुरुवारी २८ डिसेंबरला होत असलेल्या ‘है तैयार हम’ सभेसाठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून सभास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कॉंग्रेसच्या दिघोरी नाक्याजवळील मैदानात होणाऱ्या सभेसाठी देशभरातील व्हीआयपी कॉंग्रेस नेते उपराजधानीत दाखल होत आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासनाने तगड्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. सभास्थळी ४ पोलिस उपायुक्त, ४ सहायक पोलिस उपायुक्त, ८ पोलिस निरीक्षक यांच्यासह ४५० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सभेच्या ठिकाणी तसेच उमरेड मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची पोलिसांना भिती असल्यामुळे खास वाहतूकीच्या नियंत्रणासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांसह १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच १७४ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here