माधवीताई नरेश जोशी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
कर्जत ;राजमाता जिजाऊ मासाहेब अखंड हिंदुस्थानची जननी, स्वराज्यमाता जिच्या आशीर्वादाने आज संपूर्ण हिंदुस्थान समता,बंधुता आणि एक्याने नांदत आहे.
याच जिजाऊच्या विचारधारेने प्रेरित होऊन समाजासाठी स्वतःहाला पूर्णपणे झोकून देत जनतेचा विकास साधणे या उद्दात्त हेतूने कार्यरत असणारे एकमेव प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सौ.माधवीताई नरेश जोशी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाला आहे.नेहमीच ताईंचे कार्य वृध्दींगत होत जाणारे असुदेत.
स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता-राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती उत्सव जिजाऊ पुरस्काराचे आयोजन मातृतीर्थ पाचाड किल्ले, रायगड येथे शुक्रवार, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमात जिजाऊ पुरस्कार्थी सन्मानीय सौ.माधवीताई नरेश जोशी यांना विशेष गौरविण्यात येणार आहे.