Home latest News तब्बल ४ वर्षानंतर महेश कोलावार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश • चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे...

तब्बल ४ वर्षानंतर महेश कोलावार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश • चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली लालपरी

97

तब्बल ४ वर्षानंतर महेश कोलावार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

• चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली लालपरी

तब्बल ४ वर्षानंतर महेश कोलावार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश • चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली लालपरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर :11 जानेवारी
अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी लालपरीची सेवा सुरू करण्यात आली असल्याचा आनंद माझ्यासहित सिरोंचा वासियांना होत आहे असे प्रतिपादन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केले.
कोलावार म्हणाले की, २०२० मध्ये या मागणीचा हट्टहास धरला असून याबाबतचे पहिले निवेदन खुद्द आपणच पुर्व विभागीय नियंत्रक आर.एन पाटील यांची भेट घेत सादर केले होते.
मध्यंतरी काळात देखील सिरोंचाचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी,माजी तहसीलदार शंकर पुप्पालवार यांच्याही सुचनेनुसार आपण या मागणीबाबतचे विषय घेऊन विभागीय कार्यालयात विचारपूस करत लालपरी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशी मागणी करत आले.
यानंतर खासदार अशोक नेते यांनी स्वत: सिरोंच्याला बैठक घेत विभागीय नियंत्रक कार्यालयाला सुचना करत आंतरराज्यीय परवानगी घेण्याचे सुचविले होते.
त्यानंतर अनेकांनी याबाबत निवेदन सादर केले होते.
अश्या अनेकांच्या प्रयत्नांना यश आल्याची आनंदाची बातमी घेऊन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विभागीय नियंत्रक स्मिता सुतावने यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करत आभार मानले. सोबतच ही लालपरी सेवा सतत सुरू ठेवण्याची व दुपारच्या वेळेत बदल करून ३ वाजताच्या नंतर चालवावी अशी विनंती केली असता विभाग नियंत्रकांनी लालपरी सेवेच्या आर्थिक नफा – तोटांचा विचार करत या सेवा मागणीनुसार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

तर अनेक प्रयत्नानंतर सिरोंचासाठी लालपरी रवाना होतांना कार्यालयीन अधिकारी – कर्मचा-यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या प्रवासाचा शुभारंभ केला तर दुपारच्या फेरीत महेश कोलावार यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या दिवसातील दुस-या फेरीच्या प्रवासाचा शुभारंभ केला.ही लालपरी दररोज सकाळी ७ वाजता व दुपारी २ वाजता चंद्रपूरहून चेन्नूरमार्गे सिरोंचाला रवाना होणार आहे.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे, आगार प्रमुख प्रितेश रामटेके, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंत गोवर्धन,वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जुनघरे,भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार,चालक सुमित शेंडे,वाहक सचिन बैलनवार, नवनाथ वाढीकर आदींची उपस्थिती होती.