श्री साई पॉलिटेक्निक व कॅड सेंटर यांच्यामध्ये सामंजस्य करार

58
श्री साई पॉलिटेक्निक व कॅड सेंटर यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्री साई पॉलिटेक्निक व कॅड सेंटर यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्री साई पॉलिटेक्निक व कॅड सेंटर यांच्यामध्ये सामंजस्य करार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 जानेवारी
स्व. मुरलीधरराव येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत श्री साई पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व वेगवेगळया विषयाबद्दल प्रात्याक्षिक ज्ञान मिळावे या दृष्टीकोनातून संस्थेचे उपाध्यक्ष मा. अमित येरगुडे यांच्या मार्गदर्शनात विविध वस्त उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाद्वारे मंगळवार, २३ जानेवारी रोजी कॅड सेंटर, चंद्रपूर व श्री साई पॉलीटेक्निक चंद्रपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अमित येरगुडे, सहसचिव अभिषेक व्हि. येरगुडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.ए. आर. बहाले, विभागप्रमुख प्रा. एन.डब्ल्यू. पठाण, प्रा. एस. एम. डेंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅड सेंटरचे सलमान सय्यद व कॉलेजचे प्राचार्य प्रा.एस.एन. पिलारे यांनी या सामंजस्य करारमुळे श्री साई पॉलीटेक्नीक, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांना आमच्या इन्स्टिटयुट मध्ये ऑटोकेंड व विविध सॉफ्टवेअर चे ट्रेनिंग देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपले स्कील वाढविण्याकरीता प्रयत्न करावा असे आवाहन सुध्दा याप्रसंगी त्यांनी केले. या सामंजस्य कराराच्या यशस्वीतेसाठी कॅड सेंटरचे सलमान सय्यद व श्री साई पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्रा.के.व्ही. शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.