रा.जि.प.शाळा पालेखु्र्द या शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पनवेल तालुका प्रतिनिधी
विजय तळकर
7208066088
पनवेल :- पनवेल तालुक्यातील पालेखु्र्द शाळेत 26जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी,शिक्षक ग्रामस्थ मोठ्या उत्साहात शाळेत उपस्थित होते. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले , शाळेचे मुख्याध्यापक विजय तळकर सर यांनी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ यांचे स्वागत केले व विद्यार्थ्याचे कौतुक केले. जेष्ठ समाजसेवक सुधीरभाऊ साठे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत , ध्वजगीत,महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले त्याचप्रमाणे संविधान वाचन केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्याचे लेझिम पथक,कवायत,भाषणे याचप्रमाणे विविध देशभक्तीपर नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले.शाळेचे उपशिक्षक डागरकर सर यांनी उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ यांचे आभर मानले.
या सोहळ्यासाठी नगरसेविका दाभणे मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयभाऊ दाभणे,कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल मा.संचालक रमाकांत दाभणे, गौरवशेट भोईर,सुनीलभाऊ साठे,किरण दाभणे,पोलीस पाटील स्वरा दुर्गे, त्याचप्रमाणे भगत गुरुजी,शाळेचे मुख्याध्यापक तळकर सर,पाटील सर,पवार सर, डागरकर सर,कोठेकर सर,इंगळे मॅडम,पाटील मॅडम शिनारे सर ,ग्रामस्थ त्याचप्रमाणे शाळेचे माझी विद्यार्थी ,अंगणवाडी सेविका,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.