Home latest News उध्दव ठाकरे यांच्या सभेला मराठी मुस्लिम सेवा संघ सहभागी होणार.. अध्यक्ष फकिर...

उध्दव ठाकरे यांच्या सभेला मराठी मुस्लिम सेवा संघ सहभागी होणार.. अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर

95

उध्दव ठाकरे यांच्या सभेला मराठी मुस्लिम सेवा संघ सहभागी होणार.. अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर

उध्दव ठाकरे यांच्या सभेला मराठी मुस्लिम सेवा संघ सहभागी होणार.. अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर
✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा १ आणि २ तारखेला जनसंवाद दौरा निश्चित करण्यात आला असता या सभेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे, त्यातच मराठी मुस्लिम सेवा संघ, मुंबई या संघाचे अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर यांनी २ तारखेला म्हसळा येथे आयोजित करण्यात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या सभेला पुर्ण पाठिंबा दर्शवला असुन सभेमध्ये सक्रिय सहभाग होणार असून सभा परिसरातील सर्व माझ्या मुस्लिम बांधवांनी उध्दव ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले आहे, मराठी मुस्लिम सेवा संघ ही महाराष्ट्रातील मुस्लिम भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सतत अग्रेसर असून आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विचार करता महाविकास आघाडिला मजबूत करणे नितांत गरज आहे असे मराठी मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर यांनी सांगितले तसेच म्हसळा तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा. पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी २ तारखेला होणाऱ्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे शिवसेना उ. बा. ठा. श्रीवर्धन मतदार संघ क्षेत्र संघटक रविंद्र लाड यांनी पक्षाच्या माध्यमातून आवाहन केले आहे.