खरी शिवसेना कुणाची आहे ते जनतेनेच ठरवु देत जनता ठरवेल ते मला मान्य आहे.. उध्दव ठाकरे. म्हसळा येथे जनसंवाद दौरा मध्ये उध्दव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती

65
खरी शिवसेना कुणाची आहे ते जनतेनेच ठरवु देत जनता ठरवेल ते मला मान्य आहे.. उध्दव ठाकरे. म्हसळा येथे जनसंवाद दौरा मध्ये उध्दव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती

खरी शिवसेना कुणाची आहे ते जनतेनेच ठरवु देत जनता ठरवेल ते मला मान्य आहे.. उध्दव ठाकरे.

म्हसळा येथे जनसंवाद दौरा मध्ये उध्दव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती

खरी शिवसेना कुणाची आहे ते जनतेनेच ठरवु देत जनता ठरवेल ते मला मान्य आहे.. उध्दव ठाकरे. म्हसळा येथे जनसंवाद दौरा मध्ये उध्दव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थिती

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळ शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व दोन तारखेला रायगडमध्ये जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता , त्या वेळी उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद दौरा साठी व सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळताना दिसला, अलिबाग, पोलादपूर, माणगाव, रोहा, म्हसळा या ठिकाणच्या सभेला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सईदअहम्मद कादीरी व नदिम दफेदार यांच्या कडून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शरिफ ए कुरान भेट देण्यात आली,म्हसळा तालुक्याच्या वतीने उध्दव ठाकरे यांचे पुष्पहार व शाल देऊन मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले,यावेळी जनसंवाद सभेला उध्दव ठाकरे यांनी थेट जनतेशी संवाद साधत असताना विरोधकांना लक्ष केले,सुप्रिम कोर्टाचा नियम धाब्यावर बसवून आमची शिवसेना चोरलीत,जनतेला ठरवुन देत कि खरी शिवसेना कुणाची आहे ती जनता सांगेल ते मला मान्य आहे असे बोलुन शिंदे गटावर निशाणा सादला,कोरोना काळात मुख्यमंत्री असताना मी कधीही भेदभाव केला नाही,मी उत्तम काम केले म्हणून पहिल्या पाच मध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचा मान मिळाला,तो मान उगाच मिळतो का असा प्रश्न देखील उपस्थित केला,तसेच उध्दव ठाकरे यांनी घराणेशाहिवर देखील खासदार सुनील तटकरे यांचे नाव घेऊन लक्ष केले व घराणेशाहीला विरोध हे भाजप चे धोरण आहे, मग आता घराणेशाहिला विरोध करणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला.तसेच श्रीवर्धन मतदार संघ मधील सर्व मतदारांचे आभार मानतो कारण श्रीवर्धन मतदार संघ हा शिवसेनेचा हक्काचा बालेकिल्ला आहे जशी तुम्ही त्या वेळी तुकाराम सर्वे यांना साथ दिलीत तशीच साथ आपले अनिल नवगणे यांना द्याल अशी आशा बाळगतो, तसेच भास्कर जाधव यांनी देखील जनसंवाद सभेमध्ये बोलताना सांगितले की दोन दिवसात सहा सभा घेतल्या आहेत आणि हजारोंच्या संख्येने उपस्थिती होत आहे यातुनच स्पष्ट होत आहे की जनता तुमच्या बाजुने आहे.या वेळी मराठी मुस्लिम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर यांनी या सभेला खास उपस्थिती दर्शविली, म्हसळा येथे जनसंवाद सभेला शिवसेना उ. बा. ठा. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येणार म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आले होते, वाहतुकीवर देखील कोणत्याही प्रकारचे परिणाम झाले नाही, म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही सभा यशस्वी पार पडावी म्हणून खूप मेहनत घेतली, यावेळी जनसंवाद सभेला उपस्थित शिवसेना उ. बा. ठा. गटाचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते अनंत गीते,आमदार भास्कर जाधव,विधानसभा गटनेते अजय चौधरी, माजी आम.विनोद घोसाळकर,मिलींद नार्वेकर,किशोर जैन, मराठी मुस्लिम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष फकिर महम्मद ठाकूर, विष्णू पाटील,जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,संपर्क जिल्हा प्रमुख संजय कदम, द.रा,उपजिल्हाप्रमुख नंदु शिर्के, श्रीवर्धन. म.सं.क्षेत्र संघटक रविंद्र लाड,सुजित तांदळेकर, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,युवासेना जि.प्र.अनिल महामुणकर, शौकत हाजवाने, सहसंपर्क प्रमुख अनिल काप,क्रृष्णा म्हात्रे,कौस्तुभ करडे,सईद अहमद कादीरी, नदिम दफेदार, दिपल शिर्के, महिला आघाडी रिमा महामुणकर, निशा पाटील, तसेच हजारो शिवसैनिक उपस्थित होते.