Home latest News शालेय शैक्षणिक सहल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला   • अनेक विद्यार्थी...

शालेय शैक्षणिक सहल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला   • अनेक विद्यार्थी जखमी   

89
शालेय शैक्षणिक सहल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला   • अनेक विद्यार्थी जखमी   

शालेय शैक्षणिक सहल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला  

• अनेक विद्यार्थी जखमी  

शालेय शैक्षणिक सहल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला   • अनेक विद्यार्थी जखमी   

🖋️ मीडियावार्ता  वृत्तसेवा
📱 8830857351

मूल, 5  फेब्रुवारी      
शाळेची शैक्षणिक सहल तालुक्यातील कन्हाळगाव देवस्थान येथे घेऊन जाताना ट्रॅक्टर पलटल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाले. यात दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी घडली. तालुक्यातील  मोरवाही येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल सुरवातीला नागपूर येथे नेण्याचे ठरविले होते. पण, आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे मुख्याध्यापक नैताम यांनी आपण विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या कन्हाळगाव मारुती देवस्थान येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरमध्ये एकूण 15 मुले-मुली घेऊन निघाले. ट्रॅक्टरच्या मागे काही शिक्षक आपल्या स्वतःच्या गाडीने निघाले. मध्येच कन्हाळगाव देवस्थान रस्त्यावर मुले – मुली घेऊन जाणारी ट्रॅक्टर पलटी झाल्याने अनेक मुले किरकोळ तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमी  विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचारासाठी तात्काळ नेण्यात आले. याबाबत मोरवाही येथील शाळेचे मुख्याध्यापक  नैताम यांना विचारले असता, ते म्हणाले, शाळेच्या सहलिबाबत केंद्र प्रमुख यांचेशी चर्चा करून सहमती घेतली. मात्र, मुलांना ट्रॅक्टरनी नेणार आहोत व त्याची परवानगी घेतली नाही.