खरसई गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक निलेश मांदाडकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर. निलेश मांदाडकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने करण्यात येणार सन्मानित

खरसई गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक निलेश मांदाडकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर.

निलेश मांदाडकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल

दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने करण्यात येणार सन्मानित

खरसई गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक निलेश मांदाडकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर. निलेश मांदाडकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने करण्यात येणार सन्मानित

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा: २८ मार्च रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक निलेश मांदाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिंना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,निलेश मांदाडकर हे खरसई गावचे माजी सरपंच आहेत तसेच गावपातळीवर विविध पदांवर देखील कार्यरत आहेत. तंटामुक्त अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, मंदीर ट्रस्ट अध्यक्ष, तसेच विविध शासकीय कमिटीवर देखील काम करीत असताना मांदाडकर यांना सामाजिक व क्रिडा तसेच शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,मांदाडकर यांनी आजपर्यंत गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, अनेक विकासात्मक योजना आणल्या आहेत, गावातील शाळा यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी तसेच मुलांच्या मध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत , निलेश मांदाडकर यांच्या याच कामाची दखल घेऊन यंदाचा दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, हा पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक २८मार्च रोजी मुंबई वाकोला वेल्फेअर असोसिएशन सांताक्रुझ येथे संपन्न होणार असून या सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आजपर्यंत निलेश मांदाडकर यांना विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
————————————-
माझ्या विविध क्षेत्रातील कामाची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनी मला दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद रुपी पुरस्कार मला मिळत आहे खरच मी स्वतः ला भाग्यवान समजतो आणि दैनिक मिडिया वार्ता न्युज चे मनापासून आभार व्यक्त करतो.
निलेश मांदाडकर.
माजी सरपंच तथा समाजसेवक. खरसई.