पंढरपुर ग्रामपंचायत निवडणुक भाजप आमदार परिचारक गटाची विजयी सलामी.

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 72 पैकी जागांपैकी जैनवाडी ग्रामपंचाय बिनविरोध असून उरलेल्या 71 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे. यामध्ये एकलासपूरमध्ये भाजप आमदार परिचारक गटाने विजयी सलामी दिली आहे. तर उपरी, गोपाळपूर, गादेगाव, सुपली, खर्डी, भाळवणीत आमदार परिचारक गट आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामउळ इथं सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हाती आलेल्या निकालांनुसार, पंढरपूर तालुक्यातील भाजपचा विजयी घौडदौड सुरू आहे. अनेक जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटाची सत्ता कायम आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून 7 पैकी 7 जागांवर भाजपचा विजयसिंह मोहिते-पाटील गटाने आपला झेंडा फडकविला आहे. यानंतर विजयी उमेदवारांनी रॅली काढण्यात आपला आनंदोत्सव साजरा केला. इतकंच नाही तर आता भाजपच्या कार्यकर्त्यांचाही जल्लोष सुरू झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here