ग्रामपंचायत निवडणुक सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव.
औरंगाबाद:- औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात एक लक्षवेधी लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत सुनेने आपल्या सासूचा तर जावयाने आपल्या सासऱ्याचा पराभव केला आहे. धोंधलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. शिवशाही पॅनलकडून जावई लक्ष्मण काळे हे तर त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य हे छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते.
आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.