रेशन दुकानांमध्ये आता फोर जी तंत्रज्ञान ई-पॉस मशिन’ व ‘आयरीस स्कॅनची सोय तहसीलदार यांचा हस्ते म्हसळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप

रेशन दुकानांमध्ये आता फोर जी तंत्रज्ञान ई-पॉस मशिन’ व ‘आयरीस स्कॅनची सोय तहसीलदार यांचा हस्ते म्हसळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप

रेशन दुकानांमध्ये आता फोर जी तंत्रज्ञान
ई-पॉस मशिन’ व ‘आयरीस स्कॅनची सोय

तहसीलदार यांचा हस्ते म्हसळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप

रेशन दुकानांमध्ये आता फोर जी तंत्रज्ञान ई-पॉस मशिन’ व ‘आयरीस स्कॅनची सोय तहसीलदार यांचा हस्ते म्हसळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिनचे वाटप

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- रेशन दुकानदारांना जुन्या टूजी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरण करण्यात अडचणी येत होत्या. याबाबत रेशन दुकानदार संघटनांनी फोरजी ई-पॉस मशिन देण्याची मागणी केली होती. त्यावर म्हसळा तालुक्यात पुरवठा विभागाकडून तहसीलदार समीर घारे यांचा हस्ते म्हसळा तालुक्यातील 45 रेशन दुकानदारांना फोर जी ई-पॉस मशीन देण्यात आले.
अनेक ई-पॉस मशिनमधील सीमकार्ड निरुपयोगी झाले असताना, रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करीत होते. गर्दीच्या वेळी मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना बऱ्याच अडचणी आल्या. या कारणावरून ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादही होत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार फोर जी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही होते.
या ई पॉस मशिनसोबत आयरिस स्कॅनरही दिले जाणार आहे. ज्या वयोवृद्ध लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नाहीत त्यांच्यासाठी आयरिस स्कॅनर वापरता येणार आहे. आधार कार्डवर जसा रेटीना स्कॅन होतो, अगदी तसेच स्कॅनिंग यामध्ये होणार असल्याने आता अंगठ्याचा ठसा उमटला नाही तरी अडचण येणार नाही.
अत्याधुनिक व्हर्जनच्या पॉस मशिनमध्ये मोठा डिस्प्ले, उत्तम बॅटरी क्षमता, दोन सीमकार्ड वापरता येण्याची सुविधा, पावतीची प्रिंट काढण्याची सोय, ठसे जुळत नसलेल्यांसाठी आयरिस स्कॅनची सुविधा, दैनंदिन वाटप आकडेवारी साठवण्याची सुविधामुळे वितरण प्रणाली अधिकाधिक पारदर्शक व सुलभ होणार असल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी रेशन दुकानदार यांना मार्गदर्शन करताना सांगितले.तसेच सर्व दुकानदारांनी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान सुद्धा तहसीलदार यांनी केले.