पत्नी नावाची जिवंत देवी....

कविता

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

पत्नी नावाची जिवंत देवी....

पत्नी नावाची जिवंत देवी….

बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा
खरंच गंभीर गुन्हा आहे !!

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
पानही हालत नाही…..
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !!

नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय ??
तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय ??

स्वच्छ, सुंदर,पवित्र घर
बायकोमुळेच असतं…..
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !!

वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते…
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय
म्हणूनच जास्त असते !!

तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !!
कुटुंबाच्या कल्याणासाठी
दिवस रात्र धावते !!

चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ??

बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका…..
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका…..

बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !!
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !!

बायको म्हणजे सप्तरंगी
इंद्रधनुष्य घरातलं !!
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !!

नवरोजी बायकोकडे
माणूस म्हणून पहा…..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा…..

कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !!

🙏🙏 *घरासाठी झटणाऱ्या सर्व गृहिणींना मनापासून समर्पित*🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here