डाॅ.बाबा साहेबांचाआदर्श ठेवून पुढील शिक्षण घेणार.–कु.संबोधी जाधव.  एस् एस् निकम इंग्लीश स्कुलच्या.संबोधीने स्वकष्टाने मिळवले ८८% गुण.

डाॅ.बाबा साहेबांचाआदर्श ठेवून पुढील शिक्षण घेणार.--कु.संबोधी जाधव.  एस् एस् निकम इंग्लीश स्कुलच्या.संबोधीने स्वकष्टाने मिळवले ८८% गुण.

डाॅ.बाबा साहेबांचाआदर्श ठेवून पुढील शिक्षण घेणार.–कु.संबोधी जाधव. 
एस् एस् निकम इंग्लीश स्कुलच्या.संबोधीने स्वकष्टाने मिळवले ८८% गुण.

डाॅ.बाबा साहेबांचाआदर्श ठेवून पुढील शिक्षण घेणार.--कु.संबोधी जाधव.  एस् एस् निकम इंग्लीश स्कुलच्या.संबोधीने स्वकष्टाने मिळवले ८८% गुण.

किशोर पितळे- तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९

तळा :- तळा-दहावी शालांत परीक्षा २०२४ मध्ये परीक्षेत अतीशय मेहनतीने ८८%मिळवलेले गुण महत्वाचे आहेत दहावीची परीक्षा हि महत्वाची असुन पुढील शिक्षणाला कलाटणी देणारी यशाची पहीली पायरी असते हे तीचे वडील ऍड.उत्तम जाधव यांनी इयत्ता८वी त असतानाच सांगीतले तेव्हापासून कुमारी संबोधीने मनावर घेऊन त्या इयताचा अभ्यास केला आणी दहावी परीक्षेत ९०%मार्क मिळवण्यासाठी धडपडू लागली. तालुक्यातील तळेगांव या ग्रामीण भागात रहाणारी मुलगी पहिली पासूनचे शिक्षण तळा येथे दररोज जाणे येणे अभ्यास करणे वाहनांची अडचण वेळेत पोहोचणे सगळं अवघड होते.काहि महीने शहरात भाड्याने खोली घेऊन सहा महिने खाजगी ट्युशन घेऊन उद्दीष्ट साध्य करायचे होते.आई गीता ताई वडीलाचा वकीली व्यवसाय व दोघांचे राजकीय क्षैत्र असल्याने आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला मिळत नाही याची कल्पना होती.त्यात ईलेक्शन चे वारे वाहत होते.गाव बैठका,मिटींग सगळीच तयारीची जबाबदारी आई बाबांकडे होती तरीआपल्या छोट्या भावाला घेऊन होती.घरातून मार्गदर्शन मिळत नव्हते मात्र जे जे लागेल ते आई बाबा पुरवत होते.वडील राजकीय व वकीली क्षैत्रात नावाजलेले आहेत. वडीलांचे स्वप्न पुर्ण करायचे ९०% मार्क मिळवायचे होते. काॅम्पीटीशन मध्ये१६ विद्यार्थी होते मेहनत घेतली मिळालेले मार्क माझ्यासाठी खुप मोलाचे आहेत मी नाराज नाही.जिद्द,चिकाटी असेल तर खुप काही शक्य करु शकतो.अशी प्रतीक्रीया कु.संबोधी हिने आमच्या प्रतीनिधीशी दिली.पुढच्या शिक्षणासाठी सोयीनुसार काॅलेज मिळेल त्या ठिकाणी जावून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घेईन असे देखील मत व्यक्त केले.
प्रतिक्रीया:——    
“ग्रामीण भागात वातावरणातराहिलेल्या मुलांनी डोळ्यासमोर आदर्श ठेवून शिक्षण घेणे.स्वप्न पुर्ण करणे सामान्य नाही.आम्ही दोघे राजकारणी असून निवडणुक काळ हा कार्यकर्ता म्हणून महत्वाचा होता.पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे हे देखील महत्वाचे होते वकीली व्यवसाय सांभाळून शक्य होत नव्हते.तीने स्वत :चा अभ्यास करायची मोबाईलचा वापर अगदी फार कमी करुनमिळवलेले ८८%गुण तिसरी आली हे मेहनतीचे आहेत. माझ्या कुटुंबासाठी खुप मोलाचे महत्वाचे असून आम्ही नाराज नाही.
ऍड.उत्तम जाधव
तळेगांव तळा रायगड.