Home latest News अलिबाग नगरपालिकेकडून जिल्हा रूग्णालय व रा.जि.प. शिवतिर्थ इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर. ...

अलिबाग नगरपालिकेकडून जिल्हा रूग्णालय व रा.जि.प. शिवतिर्थ इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर. संबधीत इमारतींमध्ये अदयापही वर्दळ असल्याने शासनाने त्वरीत लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी. अतिधोकादायक जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमध्ये रॅंम्पसह इतर दुरूस्तीचे काम जोमात सुरू.

84

अलिबाग नगरपालिकेकडून जिल्हा रूग्णालय व रा.जि.प. शिवतिर्थ इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर.

संबधीत इमारतींमध्ये अदयापही वर्दळ असल्याने शासनाने त्वरीत लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी.

अतिधोकादायक जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमध्ये रॅंम्पसह इतर दुरूस्तीचे काम जोमात सुरू.

अलिबाग नगरपालिकेकडून जिल्हा रूग्णालय व रा.जि.प. शिवतिर्थ इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर. संबधीत इमारतींमध्ये अदयापही वर्दळ असल्याने शासनाने त्वरीत लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी. अतिधोकादायक जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमध्ये रॅंम्पसह इतर दुरूस्तीचे काम जोमात सुरू.

अलिबाग –
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग :- अलिबाग नगरपालिकेकडून अलिबाग शहरातील एकूण 31 धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये अलिबागचे मुख्य जिल्हा रूग्णालय व रा.जि.प. शिवतिर्थ इमारत या दोन शासकीय इमारतींचा ‘अतिधोकादायक’ म्हणून समावेश करण्यांत आला आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींमधून शासनाने त्वरीत लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्याची तसेच या इमारतींबाहेर सदरची इमारत अतिधोकादाय असल्याचे फलक लावण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.  
 अलिबागचे मुख्य जिल्हा रूग्णालय इमारतीमध्ये शेकडो रूग्ण उपचार घेत असून, त्यांच्याबरोबर असणारे नातवाईक, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचा वावर असतो. तसेच रा.जि.प. शिवतिर्थ इमारत रिकामी केली असली तरी या इमारतीमध्ये राजिपचे जुने रेकॉर्ड असल्याने या इमारतीमध्येही कर्मचारी ये.जा. करीत असतात. त्यामुळे येत्या पावसाळयात जर या इमारतींना काही धोका उद्भवल्यास शेकडो लोकांचे हकनाक बळी जाण्याची भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे. या विषयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप, पोलीस अधिक्षक रायगड, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अलिबाग व मुख्याधिकारी अलिबाग नगरपरिषद यांना ईमेलव्दारे पाठविले आहे.   
सामान्य रूग्णालयाची इमारत अतिधोकादायक आहे अस जाहिर करतानाच कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत या इमारतीवर रॅम्प बांधणे व इतर दुरूस्तीची काम सुरू असून हा कोटयवधींचा निधी ही इमारत पडल्यास वाया जाणार असल्याने सदरची कार्म त्वरीत थांबविण्यात यावीत अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. या बाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक रायगड व कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सावंत यांनी केला असता तो झाला नाही.
 अलिबाग नगरपालिकेने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरे अधिनियम 1965 चे कलम 195 नुसार, अलिबाग शहरांतील नमूद मालमत्ता धारकांस आवाहन करणेत येते की, आपली इमारत किंवा इतर संरचना किंवा अशा इमारतीवर किंवा संरचनेवर बसविलेली कोणतीही वास्तू भग्नावस्थेत असेल किंवा पडण्याचा संभव असेल अशा अतिधोकादायक वास्तू, इमारत किंवा संरचना या नगदपरिषदेकडून देण्यांत आलेल्या निर्देशानुसार स्वस्तरावर निष्कासित करण्यांत याव्यांत तसेच नगरपरिषदेने बजावलेल्या नोटीशीनुसार धोकादायक वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांचेकडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. व या ऑडीट अहवालानुसार वास्तू, इमारत किंवा संरचना यांची मजबूती /दुरुस्ती करुन घ्यावी, तसेच मजबूती / दुरुस्ती शक्य नसल्यास अशा प्रकारच्या भग्नावस्थेतील वास्तूत कोणीही वास्तव्य करु नये सदर इमारतीमधील रहिवाश्यांनी इतरत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. तथापी या उपरही कोणी वास्तव्यास राहिल्यास व त्यामुळे कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे जाहिर आवाहन स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्द केले आहे.