Home latest News रा जि.प.शाळा तळेगांव प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप.शाळेत किलबिलाट सुरु.

रा जि.प.शाळा तळेगांव प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप.शाळेत किलबिलाट सुरु.

96

रा जि.प.शाळा तळेगांव प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप.शाळेत किलबिलाट सुरु.

रा जि.प.शाळा तळेगांव प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप.शाळेत किलबिलाट सुरु.

(किशोर पितळे )तळा तालुका प्रतिनीधी९०२८५५८५२९

तळा :- रायगड जिल्हा परीषद प्राथमिक मराठी शाळा तळेगांव तर्फे तळा येथे आज शैक्षणिक वर्ष २०२४/२५ ता.१५जून रोजी शाळा शुभारंभ झाला असुन नवागत विद्यार्थांचा प्रवेशोत्सव पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका स्मृती शिंदे विषय शिक्षक विजय येलवे, उपशिक्षक दिनेश निकम,श्रीम.रेखा अकोलकर सरपंचा विनीता चाळके शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष किशोर कदम, उपाध्यक्ष निता तळेगांवकर यांनी स्वागत केले.यावेळी ग्रामपंचायत तळेगांव यांनी शाळेला टि.व्हि.संच भेट दिला.यावेळी प्रथम पहिली ईयत्तेत व इतर इयत्ता मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.व उपस्थित मान्यवरांंच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानामुख्याध्यापिका यांचे अधिपत्याखाली शिक्षक समीती जिल्हाध्यक्ष विजय येलवे म्हणाले की प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारला आहे.शासनाने उच्च पदवी प्राप्त शिक्षक वर्ग तसेच पाठ्यपुस्तके सोबत,मोफत गणवेश दिला जात आहे. चांगल्या पध्दतीचे प्राथमिक शाळेत दिले जात आहे.ती पहिली पायरी आहे आज शिक्षण मातृभाषेतून घेतले पाहिजे.खाजगी शाळाचा खर्च पालकांना परवडत नसल्याने प्राथमिक शाळेकडे पालकांचा कल वाढत आहे आज सर्व शाळेतील पट संख्या वाढत असलेली पाहून आनंद वाटतो पालकांनी आपला पाल्य शाळेतून घरी आल्यावर वर्गात काय शिकवले गेले त्याची मुलांकडून माहिती घेतलीपाहिजे. हे पालकांचे काम आहे.व शिक्षकांकडे संपर्क ठेवला पाहिजे.दिवसें दिवस शिक्षण पध्दत बदलतअसून या शाळेमधून सेमी इंग्लिश आहे.अधिक लक्ष घातले पाहिजे.पहिली ते सातवी पर्यंत केंद्रीय शाळा असून पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक वर्ग शाळा समीती सदस्य प्रयत्न करीत आहेत.अजून वाढ होण्याची शक्यता आहे.असे मार्गदर्शनकरुन विद्यार्थ्यांनाशुभेच्छा व्यक्त केल्या.