बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचे जयंत पाटील यांचे प्रतिपादन

बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचे
जयंत पाटील यांचे प्रतिपादन

बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचे जयंत पाटील यांचे प्रतिपादन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : – विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचा संगणकीकरण कार्यपुर्तीचा सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकारी संस्थासह बँकेतील कर्मचारी यांनीदेखील प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आजचा हा दिवस रायगडसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानाचा आहे. बँक वेगळ्या उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचाऱ्यांचेदेखील आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेने शेतकरी, गरीबांना केंद्र बिंदू ठेवून काम केले आहे. या घटकाची उन्नती झाली पाहिजे, ही भुमिका आहे. त्यामुळे एक वेगळ्या उंचीवर बँकेचे कामकाज व सहकार नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संस्थाचे संगणकीकरण करण्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील पहिली बँक ठरली याचा सार्थ अभिमान आहे. आज मिळालेले वैभव पैशापेक्षाही मोठे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, रायगड जिल्हयात वीस हजार बचत गट आहे. या बचत गटांना उभारी मिळावी यासाठी बँकेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यावर काय बदल होऊ शकते. हे माझ्या कर्मचारी अधिकारी यांनी दाखवून दिले आहे. माझ्या कर्मचाऱ्याचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे.
संस्थाचे एकत्रिकरण केले. नाबार्डचेदेखील चांगले मार्गदर्शन मिळाले. बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह महिलांबरोबरच जोडले गेलो आहोत. महिलांकडून कर्ज थकविले जात नाही. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
––—–
जिल्हा बँकेचे आदर्शवत काम
उद्या दसरा आहे, खुप पवित्र दिवस आहे. आजचा उत्सव साजरा करीत आहोत, तो सहकारातून समृध्दीकडे असा आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था संगणकीकरणाचे काम झाले आहे. राज्यात अनेक संस्था आहेत. परंतु जिल्हा बँकेकडून एक वेगळी अपेक्षा होती. त्यांनी ती अपेक्षा पुर्ण करून एक वेगळा आदर्श अन्य संस्थांसमोर ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनीदेखील चांगले काम केले. योगेश यांचेसुध्दा चांगला सहयोग लाभला आहे. जिल्हा बँकेचे आदर्शवत कामकाज राहिले आहे, असे नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड यांनी प्रतिपादन केले.
–—
जिल्हा बँकेचे पाऊल दिशादर्शक
आजचा दिवस महत्वाचा व आनंदाचा आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचे संगणकीकरण करून दिशादर्शक असे पाऊल बँकेने टाकले आहे. महिला बचत गट, सोसायटी यांचे एकत्रीकरण व संगणकीकरण करणे सोपे नाही, ते जिल्हा बँकेने करून दाखविले आहे. संगणकीकरणातून सोसायटीचे जाळे निर्माण करून संस्था बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेकजण या सहकारी जोडले जाणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संगणकीकरण केले जाणार ही अपेक्षा होती. ती अपेक्षा बँकेने पुर्ण करून पथदर्शक काम जिल्हा बँकेने केले आहे, असे राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांनी गौरवोद्गार काढले.
–—
जयंत पाटील सहकारातील चालते बोलते विद्यापिठ
देशात, राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका सकस नाही. परंतु अलिबागमधील शेतकऱ्यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इतकी आधुनिक व कार्पोरेट असल्याचा आनंद वाटला. सहकाराबाबत चांगले ज्ञान असलेले जयंत पाटील हे चालते बोलते विद्यापिठ आहे. त्यांच्याकडे सहकार एक मॉडेल म्हणून करण्याची जिद्द आहे.हे बघून खूप समाधान वाटले. संस्था गतीमान व प्रगतीशिल व्हाव्यात हा दृष्टीकोन ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहेत. जिल्हा बँक संगणकीकरण करण्यामध्ये देशात पहिली ठरली आहे. त्याचा खऱ्या अर्थाने अभिमान आहे. संगणकीकरणामुळे कामकाज सहज व सोपे होणार आहे. कामात पारदर्शकता राहणार आहे. त्यादृष्टीने पाऊल पडणार आहे. लेखा परिक्षणाचे कामकाज अधिक सूलभ होणार असल्याची माहिती लेखा परिक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here