Home latest News जिल्हा सरकारी रुग्णालय आहे की चोरट्यांचा अड्डा?

जिल्हा सरकारी रुग्णालय आहे की चोरट्यांचा अड्डा?

81

जिल्हा सरकारी रुग्णालय आहे की चोरट्यांचा अड्डा?

गरोदर महिलेचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग येथील जिल्हा सहकारी रुग्णालयात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.दोन दिवसापूर्वी गरोदरपणाच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्याआधी देखील अनेक रुग्णांचे पैसे गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज देखील सापडत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाड्यातील एक महिला तपासणीसाठी अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात झाली होती. यावेळी तिचा रक्तदाब अचानक वाढला. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला ऍडमिट करावे लागेल, असे सांगितले. तिला मेटेनिटी वार्डमध्ये आणण्यात आले.

या महिलेच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले तेव्हा तिच्या बहिणीने अंगावरील कुडी, चमकी आणि मंगळसूत्र काढून आपल्या बॅगेत ठेवले.ही बॅग तिने आपल्याजवळ ठेवली. वैद्यकीय तपासणी सुरू असताना स्टाफ ने ही बॅग समोरच्या रूम मध्ये ठेवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ही बॅग तिने समोरच्या ड्रेसिंग रूम मध्ये ठेवली.
लघवी नमुना आणण्यासाठी बाथरूम मध्ये जाऊन आल्यानंतर दागिन्यांपैकी चमकी खाली पडलेली आढळली. त्यामुळे या महिलेने ड्रेसिंग रूममध्ये बॅग तपासले असता त्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता कुणीच काही सांगेना तेथील स्टाफ ने सर्वांना हजर करण्याचे आश्वासन दिले.मात्र कुणालाच आणले नाही. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ड्रेसिंग रूम मध्ये कोणीच गेल्याचे दाखविले नाही. अशी तक्रार तेजश्री कोळी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे . यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान याआधी देखील रुग्णालयातून अशा छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र रुग्णाकडून पोलिसात तक्रार केली न गेल्यामुळे याची वाच्यता होत नाही. मात्र परवाची चोरी आणि त्याआधी एकदा अशाच प्रकारच्या चोरीच्या तक्रार अलिबाग पोलिसात दाखल आहे .

आमदार महेंद्र दळवी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर संतापले जिल्हा सरकारी रुग्णालयात होणाऱ्या चोऱ्यांची माहिती अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला चांगलेच झापले आहे. जिल्ह्यात रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात सीसीटीव्ही असतानाही रुग्णालयाच्या चोऱ्या होतातच कशा याप्रकरणी पोलिसात तक्रार करा आणि चोरला शोधून काढा अशी त्यांनी प्रशासनाला फोन करून बजावळे आहे.