चोरीचा मोबाइल टाकून दिला विहरित.

31

चोरीचा मोबाइल टाकून दिला विहरित.

त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो. 9096817953

भिवापुर.आझाद चौकातील चोरीला गेलेला मोबाइल आरोपी महिला ने विहारित टाकल्याची चेतावणी पोलिसाकडे केली होती. दरम्यान दि. २३ फरवरी ला भिवापूर पोलिसांनी आरोपी रिना रक्षिये दुपारी ४ वाजताच्या सुमारास चौकशीला बोलावून मोबाईल ज्या ठिकाणी फेकले आहे. त्या घटस्थळी पोलीस आरोपीला घेवून गेले होते. परंतु सतीन च्या विहरिला लोखंडी जाळी लावली असल्याने. या विहीरीत उतरणे शक्य नाही. तसेच या विहरिला खोल भाग दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी दोन पंचासमक्ष पंचनामा केला. पोलिसांना सदर महिला खोटी बोलत असल्यांचा संशय आहे. त्यामुळे तिचेवर पुरावा नष्टकरण्याची कलम २३८ दाखल करण्यात आल्याने आरोपी महिलेच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सदर महिला तालुका आरोग्य विभाग अंतर्गत आशा वर्कर म्हणून भिवापूर शहरात कार्यरत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण राऊत यांनी याबाबत वरिष्ट अधिकारी यांचेकडे सदर माहिती देणार असल्याचे सांगितले. व सोमनाळा प्राथनिक आरोग्य अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी याबाबतची अशी अगोदर ही तक्रार आली होती. परंतु आता याविषयीची दखल घेवून या आशा वर्कर हिचेवर योग्य कारवाई केली जाईल असे प्रतिनिधी बोलतांना संगीतले.