यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

बुलडाणा : – देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.