ठाणे कळवा पासून काही मिनिटाच्या अंतरावर सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह…
हिरामण गोरेगावकर मुंबई प्रतिनिधी
8689818225
ठाणे :- सध्या देशासहित अनेक राज्यातही खून मारामारी चे प्रकार खूप भयंकर प्रमाणात वाढत आहेत असाच काहीसा संशयास्पद प्रकारची बातमी ठाणे शहर पोलिसांना कळविण्यात आली त्यानुसार पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली तो ठाणे नाशिक रोडलगत ठाणे शहर परिसर पासून काहीच मिनिटाच्या अंतरावर जुना टोलनाक्या जवळ तसेच ठाणे , मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन च्या खाली एका अज्ञात इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले पोलिसांनी आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते परंतु जी अँब्युलन्स पोलीस घेऊन आले होते त्या अँब्युलन्स चां ड्रायवर आणि त्याच्या सोबत च्या कर्मचाऱ्याने खाली उतरून त्यांच्या मदतीने अज्ञात इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले पण या इसमा बरोबर काय घडलं कसा मृत पावला या बद्दलचा कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास करणार असल्याचे सांगितले .