The horrific explosion of the cylinder shook the darkness, injuring four people
The horrific explosion of the cylinder shook the darkness, injuring four people

सिलेंडरच्या भीषण स्फोटांनी अंधेरी हादरली, चार जण जखमी

The horrific explosion of the cylinder shook the darkness, injuring four people
The horrific explosion of the cylinder shook the darkness, injuring four people

दयानंद सावंत

मुंबई :- मुंबईतील वर्सोवा भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे. आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट होत आहे. या होत असलेल्या स्फोटांनी परिसर चांगलाच हादरला आहे.

सध्या आग आटोक्यात आली असली तरी आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आग लागल्यानं एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण 10.30 वाजता ही आग लागली असल्याची माहिती आहे.

अंधेरी येथील यारी रोड येथे आगीचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये सिलेंडरचा स्फोट होत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसत आहे. या आगीतून सतत सिलेंडरचे स्फोट होताना दिसत आहेत. या स्फोटाचे कानठळ्या बसविणारे आवाज ऐकायला येत आहे. आगीचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ज्वाला वरच्या दिशेने वेगाने फिरताना दिसत आहेत. ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यारी रोडवरील सिलिंडर स्टोरेज गोदामात सिलिंडरच्या स्फोटात चार लोक जखमी झाले. सर्व जखमींना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन इंजिन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here