दहीहंडी🔹अविरत जनसेवेची.
कोपरगाव मध्ये सर्वात भव्य दहीहंडी उत्सव साजरा.
दैनिक मीडिया वार्ता.
अहिल्यानगर: कोपरगाव.
🔹9370127037🔹
दि.21/8/2025.
अहिल्यानगर: पोहेगाव.
अहिल्यानगर मधील कोपरगाव तालुक्यामध्ये आयोजित दहीहंडी जनसेवेची उत्साहात साजरी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आयोजित दहीहंडी अविरत जनसेवेची उत्सव अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरा झाला.
राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी दिलेल्या सहभागामुळे उत्सवाची रंगत वाढली.
कोपरगाव मधील नागरिक व महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री ज्योत्सना सपकाळ यांची उपस्थिती होती. त्यांच्या नृत्य अविष्काराने तसेच डीजेच्या धमाकेदार बिट्सने गोविंदा पथके व नागरिकांचा उत्साह वाढला. तसेच कल्याण श्री साईलीला येथील महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिला कुठे कमी नाहीत हे दाखवून दिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
🔹🔹🔹