चोरट्या कडून१५ ग्रॅम सोन्याची सोनसाखळी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
उमरेड.दिवसोनदिवस चोरींच्या घटनांमध्ये वाढ होती आहे अशाच एका चोरीच्या घटनेत दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी उमरेड येथे अपराध क्रमांक 640 2025 कलम 34 चा समांतर तपास करीत असताना सीसी टीव्ही फुटेज आणि बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी मन्नू सिंग उर्फ जनरेल सिंघ रामसिंग ताक वय वर्ष 45.रा. समतानगर नेरी यास यांच्याकडून १५ ग्रॅम सोन्याची सोनसाखळी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमरेड पोलिसांनी 200च्या वर सीसी टीव्ही कॅमेरे चेक केले हे विशेष आणि मात्र सहा तासाच्या आत आरोपीस अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, सहाय्यक निरीक्षक सागर गोमासे पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे सहायक फौजदार मिलिंद नांदुरकर पोलीस हवालदार विष्णू जायभाये प्रमोद भोयर संजय बडोदिया रोहित आडे राहुल पाटील विनोद कोठे सुमित बागडे यांनी पार पाडली.