श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कबड्डी स्पर्धेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक.

30

श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कबड्डी स्पर्धेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक.

श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर निवड.

दैनिक मीडिया वार्ता अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037

दि.2/9/25. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये
अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती कोपरगाव आणि संजीवनी अकॅडमी यांच्या वतीने आयोजित 2025-26 शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये
श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी येथील14 वर्षे व 19 वर्षे दोन्ही वयोगटातील विद्यार्थ्यांचा कोपरगाव तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे व त्या दोन्ही संघाची
अहिल्यानगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल क्रीडा विभाग प्रमुख श्री विठ्ठल वसावे, कबड्डी मार्गदर्शक श्री देवेंद्र भोये व श्री. नितीन निकम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष व कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे साहेब, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य,पालक शिक्षक संघ अध्यक्ष व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रकाश चौरे सर, उपमुख्याध्यापक श्री. माने सर व पर्यवेक्षक श्री.झावरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.
🔹🔹🔹