Home latest News फाटलेल्या फलकांमुळे अलिबाग चे विद्रुपीकरण

फाटलेल्या फलकांमुळे अलिबाग चे विद्रुपीकरण

46

फाटलेल्या फलकांमुळे अलिबाग चे विद्रुपीकरण

संबंधित जाहिरात व्यवसायिका वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग डोकेदुखी ठरत असून अधिक काळ लटकत राहिल्याने ते फाटतात. असाच अलिबाग पेण मुख्य रस्त्यावरील खंडाळा येथील फाटलेला अवस्थेत असलेला मुख्य रस्त्यावरील होर्डिंग फलक लोकांचे लक्ष वेधत आहे.

अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यावर मोठमोठे होल्डिंग्स, बॅनर लावण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.वाढदिवस,स्पर्धा, शुभेच्छा अशा साठी हे बॅनर लावले जातात. परंतु वाढदिवस झाल्यावर ,स्पर्धा झाल्या तरी ते बॅनर वेळेत उतरवले जात नाहीत.त्यामुळे ते फाटले जाऊन त्याचे विदृपीकरण जास्त होत असतात.

रस्त्याच्या दुतर्फा कोणताही फलक लावायचा असेल तर त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. तसेच रस्त्याच्या पासून काही मीटर अंतरावर जाहिरात फलक लावता येत नाही. अशी नियमावली असून सुद्धा संबंधित होल्डिंग वाले या नियमाची पायमंली करताना दिसत आहेत.

अशातच अलिबाग पेण महामार्गावरील खंडाळा येथील रस्त्याच्या शेजारी भव्य जाहिरात होल्डिंग कंपनी मार्फत लावण्यात आले आहे. त्या होल्डिंग वरील लावलेले बॅनर हे फाटून अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत त्यामुळे ते खूप विद्रूप दिसत आहे. हे होल्डिंग अलीबागच्या विद्रुपीकरणात भर टाकत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दर्शनीय भागात काही जाहिरातीचे अनधिकृत होर्डिंग फलक लावल्याने व ते अधिक काळ लटकत फाटून शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकत आहेत. कोणतीही कारवाई होत नसल्याने सोशल मिडीयावर जाहिरपणे या सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्य रस्त्यावर प्रसिद्धी करिता लावलेला फलक पूर्णपणे फाटल्याने अलिबाग च्या विद्रुपीकरणात भर टाकत असताना प्रशासना कडून तो का हटवला जात नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे
.तरी संबंधित होल्डिंग व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.