Home latest News ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि दिव्यांग शिबिराचे...

ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि दिव्यांग शिबिराचे यशस्वी आयोजन.

70

ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि दिव्यांग शिबिराचे यशस्वी आयोजन.

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा :ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि दिव्यांग शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियानांतर्गत संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण आयोजित शिबीरांतून महिलांची निरोगी जिवनशैली, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी टेक – होम -राशन (टी एच आर) चे वितरण, या संकल्पनेतून स्वस्थनारी सशक्त परिवार योजना सुरु झाल्याचे डॉ. निशिकांत पाटील जिल्हा शल्यचिकित्सक यानी सांगितले यावेळी डॉ. किरण शिंदे,आर.एम ओ, रायगड,म्हसळा नगरसेविका राखी करंबे यानी म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल पावसेकर, डॉ.शिवम,आणि कर्मचारी वर्ग रुग्ण सेवा आत्मीयतेने करतात, म्हसळ्या सारख्या दुर्गम गावासाठी टेलीमेडीसीन सल्ला केंद्र आशा बहुविध सुविधा आरोग्य विभाग पुरविते असे यावेळी आभीमानाने सांगत कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.यावेळीडॉ.सोनाली जुन्नरकर- करंबे,स्त्रीरोगतज्ज्ञ,डॉ.शंतनू डोईफोडे ,नेत्र तज्ञ,डॉ.विजय म्हसकर,मनसोपचार तज्ञ, डॉ. कौस्तुभ केळसकर,भीषक.डॉ.प्रणव कोळी, अस्थीरोगतज्ज्ञ,डॉ. रामदास, स्त्रीरोग तज्ञ,डॉ. देविदास मते, बालरोगतज्ञ्,डॉ.संगमेश्वरमहाजन, वैद्यकीय अधिकारी,जिल्हा रुग्णालय, अलिबाग डॉ. प्रद्युम्न तुंबारे, दंत रोग तज्ञ, म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल पावसेकर, जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील वैद्यकीय पथक आणि ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथील सर्वअधिपरिचारीका आणि आन्य कर्मचारी वृंद यांच्या माध्यमातून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि दिव्यांग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यांत आले. यावेळी स्त्री रोग १५, भिषक १२, नेत्ररोग १७, अस्थिव्यंग १३, जनरल ओपीडी २६,दंत ४, मानसिक रुग्ण ४, बालरुरण ९ आशा रुग्णांची,तर दिव्यांगामध्ये अस्थिव्यंग ३२, नेत्र ४, मानसिक ११ भिषक २३ रुग्णांची तपासणी करण्यांत आली, काही दिव्यांगाना यावेळी तात्काळ दाखले वाटप करण्यांत आले.काही गंभीर रुग्णाना पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात येणार आसल्याचे अधिक्षक डॉ. प्रफुल्ल पावसेकर यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले.